• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यापीठाचा युवारंग युवक महोत्सव तुर्तास रद्द करावा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 5, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १ सप्टेंबरपासून प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठाने आयोजित केलेले युवारंग युवक महोत्सव उन्हाळ्यामुळे तुर्तास रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष भुषण भदाने व माजी जिल्हाध्यक्ष ॲड. कुणाल पवार यानी कुलगुरू यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे यंदा आंतर महाविद्यालयीन “युवारंग युवक महोत्सव” हा दि . १९ एप्रिल ते २४ एप्रिल २०२२ ह्या तारखांना होणार आहे . याचा कालावधीत भर उन्हाळ्या मध्ये सुमारे ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमान ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात जळगाव जिल्हा रोज चर्चेत आहे त्या तापमानामध्ये ऐन परिक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शैक्षणिक हिताचा विचार न करता विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवारंग युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे.त्यामागे कोणाचे कोणते आर्थिक फायदे आहेत हे न समजणारे कोडे आहे.

यंदा युवारंग युवक महोत्सव तूर्त रद्द करण्यात यावा कारण
१ ) महाविद्यालयांना किमान दोन महिने अगोदर युवारंगाच्या तारखा कळवाव्या लागतात . त्यामुळे स्पर्धक विद्यार्थ्यांची संबंधित स्पर्धेसाठी निवड चाचणी ( ऑडिशन ) घेऊन निवड करावी लागते .
व अश्या निवड केलेल्या विद्यार्थ्यांना सरावासाठी किमान १ महिना कालावधी आवश्यक असतो.त्यामुळे ते पडद्यावर चांगला अभिनय करू शकतात.
२ ) करोनाच्या पार्श्वभूमीमुळे व एस .टी . च्या संपामुळे सर्वच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही समाधान कारक नाही . त्यात बहुतेक महाविद्यालयामध्ये अंतर्गत परीक्षा सुरू झालेल्या आहेत .
३ ) हवामान खात्याने उष्णतेची लाट येण्याचे भाकित केलेले आहे . प्रखर उन्हामुळे व पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्षा मुळे उष्माघाताच्या संभव आहे .
४ ) यंदा करोना मुळे महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठीत झालेली नाही. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्गास अडचण होत आहे.

वरिल बाबींचा सकारात्मकविचार करता .युवारंग युवक महोत्सव ह्या काळात आयोजन करणे योग्य होणार नाही . म्हणुन यंदा युवक महोत्सव न घेता पुढील वर्षात तो डबल ताकदीने घेण्यात यावा.तसे न झाल्यास विद्यार्थी वर्गाची जीवाची जबाबदारी आपण घ्यावी जेणे करून त्यांना उष्माघात ,रस्तेवरील काही समस्या ,राहण्याचा ,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,उद्भवल्यास त्यातून काही हानी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासन यांनी असे सांगण्यात आले आहे.

Previous Post

वावडदा विकासोवर नम्रता पॅनलचे वर्चस्व

Next Post

शिरीष मधुकराव चौधरी महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

Next Post
शिरीष मधुकराव चौधरी महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

शिरीष मधुकराव चौधरी महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !
क्राईम

खळबळजनक : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !

July 15, 2025
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
राजकारण

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

July 15, 2025
उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका !
राजकारण

उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका !

July 15, 2025
नवविवाहितेने सासरी घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

नवविवाहितेने सासरी घेतला टोकाचा निर्णय !

July 15, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविली रोकड !

July 15, 2025
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

कार्ड अडकल्याचा बहाणा : एटीएममधून ग्राहकांचे दोन लाख लांबवले !

July 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group