• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

इंस्टाग्रामवर प्रेम जुळले अन विवाहितेची मुलासह पाचोऱ्याच्या प्रियकरासोबत आयुष्य संपवलं !

editor desk by editor desk
May 7, 2025
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
इंस्टाग्रामवर प्रेम जुळले अन विवाहितेची मुलासह पाचोऱ्याच्या प्रियकरासोबत आयुष्य संपवलं !

पाचोरा : प्रतिनिधी

सोशल मीडियावर प्रेम संबंध जुळलेल्या बारामती येथील विवाहित महिलेने पाचोरा येथील विवाहित तरुणासोबत स्वतःच्या बालकासह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ५ मे रोजी रात्री घडली. राजेंद्र निंबा मोरे (वय २३, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा), राधिका ऊर्फ सोनी लहू ठाकरे (२५, रा. बारामती, जि. पुणे) व तिचा चार वर्षाचा मुलगा सारंग ठाकरे अशी मयतांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा-परधाडे रेल्वेमार्गावर रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पुरुष व महिला तसेच लहान मुलाचा मृतदेह आढळला. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. हे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. मृतांची ओळख बराच वेळ पटत नव्हती. ६ रोजी सकाळी हातावर गोंधलेल्या नावावरून राजेंद्रची ओळख पटली.

याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत. मृतदेहाचे विच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून, मयत राधिका हिच्या सासरी व माहेरी नातेवाइकांना ही घटना कळविण्यात आली आहे.

मयत राजेंद्र निंबा मोरे हा भातखंडे खुर्द, ता. पाचोरा येथील रहिवासी होता. त्याचा चार वर्षांपूर्वीच विवाह झाला. त्यास पत्नी व एक मुलगी असून, राजेंद्र याने इंस्टाग्रामवर राधिका ऊर्फ सोनी लहू ठाकरे हिच्याशी गेल्या महिन्यातच प्रेमसंबंध जुळवले.  राधिका ऊर्फ सोनी हिस पती व तीन मुले आहेत. त्यापैकी लहान मुलगा सारंग लहू ठाकरे यास तिने सोबत आणले होते. राजेंद्र व राधिका यांची भेट मागील महिन्यात सप्तशृंगी गडावरील यात्रेच्या निमित्ताने झाल्यावर त्याने राधिका हिला भातखंडे खुर्द गावी आणले. राजेंद्रच्या आई-वडिलांना ही बाब मान्य नसल्याने त्यास घरात प्रवेश दिला नाही.  प्रेमीयुगुल गेल्या महिनाभरापासून भटकत होते. अखेर त्यांनी दि. ५ रोजी रात्री आठच्या सुमारास सोबत असलेली कपड्यांची पिशवी एका झाडाखाली ठेवून धावत्या रेल्वेखाली बालकासह आत्महत्या केली.

Previous Post

भारताची मोठी कारवाई : मध्यरात्री ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर हवाई हल्ला

Next Post

चोरट्यांनी घर केले साफ : अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली !

Next Post
चोरट्यांनी घर केले साफ : अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली !

चोरट्यांनी घर केले साफ : अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group