नवी दिल्ली – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. देशभरात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. करोनाच्या या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सध्या तीन लस भारतात उपलब्ध आहेत. दरम्यान भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे.जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन दिली आहे.
सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लशींच्या व्यतिरिक्त रशियाची स्पुटनिक ही लस उपलब्ध आहेत. यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सच्या लशीची भर पडली आहे.