यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्याकडून मेंढपाळांची बकरी व कुत्रा लांबविण्याचा प्रकार दोन रोजी घडला. घटनास्थळी वन विभागीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली झालेल्या प्रकाराने २ रोजी जनार्दन तुकाराम महाजन यांचे शेत गट नंबर ११२ दहिगाव शिवार मध्ये यादव कुटुंब मेढ्यांसह मुक्कामी आहेत.
प्रत्यक्षदर्शी मेंढपाळांनी बिबट्या झाडावरून उतरताना बघितला त्याने लागलीच त्यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्यास लंपास केले, तर काही वेळातच बाळू रमेश माळी यांच्या शेतातही मेंढपाळाची एक बकरी लंपास केली. घटनास्थळाजवळ उमटलेले ठसे हे तडसाचे असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे, मात्र पाहिलेला बिबट्याच होता असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे सध्या शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे.
त्यातच वारंवार बिबट्या दिसत असल्याच्या घटना घडत असल्याने आता शेतकरी व शेत मजूर चांगलेच धास्तावले आहेत. नुकतेच डोंगरगड येथे बिबट्याचे दर्शन होऊन शेतकऱ्याची आणि बिबट्याची धरपकड सारखी घटना घडली. त्या आधी यावल तालुक्यातील पाडळसे शिवारानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा दहिगाव शिवारात झालेल्या या प्रकाराने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान पश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी दहिगाव व सावखेडासीम परिसरातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.