जळगाव : प्रतिनिधी
स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्याची उत्तरे मिळत नाहीत आणि स्त्रिया प्रश्न विचारायला संकोचतात तश्या घाबरतात. मुलींना मासिक पाळी का येते? वयाच्या ५०-५५ नंतर मासिक पाळी जाते, नेमकं काय होतं?. तिला भीती वाटत असते, आपली गरज संपली, म्हणून पाळी गेल्याची त्या आपल्या पतीला सांगत नाही, त्यातून त्यांचा कोंडमारा होतो. कुटुंबात विसंवाद सुरू होतो. हा संवाद शास्त्रीय द्दष्टीकोनातून साधण्याकरता दिनांक ६ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत हॉल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मोहोपाडा रसायनी, ग्रुप ग्रामपंचायत वासांबे, आणि अक्षर मानव, मोहोपाडा रसायनी आयोजित करत आहे,
तिच्या मनाचिये गुंती
संवाद प्रत्येकाचा संवाद स्त्री मनाचा…
हा संवाद फक्त स्त्रीसाठी नसून हा संवाद पुरूषांसाठी देखील आहे. रसायनी मोहोपाडा परिसरातील सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संवादक : आरती नाईक, राज्य महिला विभाग कार्यवाह, महा अंनिस
प्रमुख उपस्थिती : मा. उमाताई मुंढे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मोहोपाडा वासांबे
संपर्क :
१. रोहिदास कवळे 9370035676
( कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मोहोपाडा रसायनी आणि अक्षर मानव ग्रंथालय विभाग प्रमुख, महाराष्ट्र)
२. कुणाल सुभाष जाधव 8796788383
( सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मोहोपाडा रसायनी)