लाईव्ह महाराष्ट्र न्यूज;- शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट नेहमीप्रमाणे आली असून पारा ४२ ते ४४ अंशावर गेला असल्याने सकाळी १० वाजल्यापासूनच चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला असून मेहुणबारे येथील ४८ वर्षीय शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी असे मयताचे नाव आहे . मात्र त्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील सुंदरलाल गढरी हा शेतमजूर बकऱ्या चारण्यासाठी मेहूणबारे परिसरात गेले होते. सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेला असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते घरी परतले. . त्यांना डॉक्टरकडे नेले असतानाच त्यांचा मृत्यू झाला. खाजगी डॉक्टराने त्यांना तपासले असता उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले.