अमळनेर : प्रतिनधी
आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली.
एका विवाहित महिलेचा पती दुसऱ्याच महिलेबरोबर पळून गेल्याने तिचा खावटीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. म्हणून ही महिला येथे आई वडिलांकडे राहात होती. महिलेचे आई वडील दसऱ्यानंतर ऊस तोडायला अहिल्यानगर येथे गेले होते. मुलीचा न्यायालयात खटला सुरू होता म्हणून ते आपल्या मुलीला तिच्या चुलत मामाकडे ठेवून गेले होते. चुलत मामाने आपल्या भाचीला आणि तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केला. पीडितेने दि. २९ एप्रिल रोजी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे.