Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एजाज खानचा ‘हाउस अरेस्ट’ शो बंद करा ; पोलिसांना पत्र !
    क्राईम

    एजाज खानचा ‘हाउस अरेस्ट’ शो बंद करा ; पोलिसांना पत्र !

    editor deskBy editor deskMay 2, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात सर्वत्र उल्लू अॅपवरील एजाज खानचा ‘हाउस अरेस्ट’ हा शो बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील या शो बाबत आक्रमक झाल्या असून त्यांनी शो वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले असून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

    अभिनेता एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोवरून वाद निर्माण झाला आहे. या शोवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. या शोची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, एका टास्कदरम्यान , महिला स्पर्धकांना त्यांचे कपडे काढण्यास भाग पाडले जात आहे. सोशल मीडियावर लोक या शोविरुद्ध संताप व्यक्त करत असून आणि तो त्वरित बंद करण्याची मागणी करत आहेत. याआधी भाजपच्या आमदार चित्रा वाघ आणि ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चर्तुवेदी यांनी देखील हा शो बंद करण्याबाबत मागणी केली आहे.

    रुपाली चाकणकर म्हणाल्या, उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत, महिलांना अंगावरील कपडे उतरवण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत.याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे. हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा, माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.

    रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले असून त्या पत्रात म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलग १००(१) (क) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्थिकारणे आणि त्या बाबीची स्वाधिकारे दखल घेणे बाकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.

    उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हाऊस अरेस्ट हा शो प्रसारित होत आहे. या शोचे होस्ट एजाज खान सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारुन आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत, स्त्रीयांना अंगावरील कपडे उतरवण्यास प्रोत्साहन देत आहेत. असे व्हिडिओ समाज माध्यमातून समोर येत आहेत. याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने सदर प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्पाधिकारे दखल घेतली आहे.

    प्रकरणी प्रसार माध्यगाव्दारे महिलांची प्रतिष्ठा व सन्मान दुखावेल असे अश्लिल व वादग्रस्त वित्रिकरण दाखवणे गंभीर स्वरुपाचे असून, सदर शोचे प्रसारण बंद करावे व संबंधितांवर बी.एन.एस व स्त्रीयांचे अश्लिल प्रदर्शन प्रतिबंधक कायदा १९८६ अंतर्गत तसेच महिती प्रसारण कायदा (IT Act, २०००) प्रमाणे सहभागी सर्वांवर न्यायांकित कार्यवाही व्हावी. सदर हाऊस अरेस्ट या शोवर योग्य ती नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा बत्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२(२) व १२८३ नुसार आयोगास तात्काळ mscwmahilaayog@gmail.com या ई-मेल वर तात्काळ पाठविण्यात यावी.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.