Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणी गंभीर जखमी !
    क्राईम

    भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणी गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskMay 2, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे तरुणीचे दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी 1 मे रोजी रात्री 8 वाजता घडली आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ परिसरातील रहिवासी नयन मिलिंद तायडे (वय 22) आणि रोहित संजय माळी (वय 21, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) असे दोन जण जखमी झालेल्यांची नावे आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाकडून तरुणी नयन तायडे आणि तरुण रोहित माळी हे दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून उड्डाणपुलाकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी रोडवर पडल्याने तिच्या पायावर ट्रॅकचे दोन्ही चाक गेल्याने तिचा दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला. तर रोहित हा गंभीर जखमी झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. या घटने संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत कुठलेही नोंद करण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.