जळगाव : प्रतिनिधी
भरधाव ट्रकने दुचाकीजवळ उभे असलेले श्रीपाद प्रभाकर कुलकर्णी (५४, रा. अमळनेर) यांना धडक दिली. त्यात त्यांचा डावा चिरडला जाऊन गंभीर जखमी झाले. हा अपघात दि. ९ एप्रिल रोजी आकाशवाणी चौकात झाला होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील श्रीपाद कुलकर्णी हे आकाशवाणी चौकात दुचाकीजवळ उभे होते. त्या वेळी भुसावळकडून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच १८, एपी २९६७) कुलकर्णी यांचा डावा पाय चिरडला गेला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकों उषा सोनवणे करीत आहेत.