जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलीस दलात असताना कोणाशी संपर्कात असावे, याचे भान न ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना निलंबित करण्यात आले. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. निलंबन काळात या प्रकरणाची चौकशी भुसावळ विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.
इग्स प्रकरणात फरार असलेल्या संशयितांशी २५२ वेळा संपर्कात असल्याच्या कारणावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना पोलिस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची जळगाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. ड्रग्स प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. मात्र पोलिस दलात काम करीत असताना कोणाशी संपर्कात असावे, याचे भान न ठेवल्याने पोटे यांना निलंबित करण्यात आले आहे