नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असतानाच बुधवारी केंद्रीय कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक पार पडाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीमध्ये ज्या नागरिकांचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला, त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी होतं होती, अखेर याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी जगणननेसोबतच जातीनिहाय जनगणना देखील करण्यात येणार आहे.दुसरा मोठा निर्णय म्हणजे केंद्र सरकारकडून ऊस पिकासाठी एफ आर पी जाहीर करण्यात आला आहे. प्रति क्विंटर 355 रुपयांचा एफआरपी जाहीर करण्यात आला आहे