नाशिक वृत्तसंस्था । नाशिक येथील देवळाली ते घोटी दरम्यान मुंबईकडून जयनगरला जाणाऱ्या पवन एक्सप्रेसचे १० ते १२ डबे रुळावरून रविवारी दुपारी घसरले. यामुळे मध्य रेल्वेकडून ११ गाड्या रद्द करण्यात आल्या.
याबाबत माहिती अशी की, पवन एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे मुंबईहुन सुटणारी देवगिरी एक्सप्रेस, हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, पुरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच हावडा दुरांतो एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, उद्योगनगरी एक्सप्रेस, सुलतानपुर सुपरफास्ट एक्सप्रेस, पंजाब मेल, पटना-जनता एक्सप्रेस, सेवाग्राम या सर्व गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच पंचवटी एक्सप्रेस (१२१०९/१०), नंदीग्राम (११४०१), हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी (१७६११/१२), पुरी सुपरफास्ट (१२१४५/४६), अमरावती सुपरफास्ट (१२१११), मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस (१२११२), अजमेर शताब्दी एक्सप्रेस (१२०१५), देवगिरी एक्सप्रेस (१७०५७) या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस (१२०१६), देवगिरी एक्सप्रेस (१७५८), नंदीग्राम (११४०२), तपोवन एक्सप्रेस (१७६१८) या चार रेल्वेगाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच (शॉर्ट टर्मिनेट) थांबला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.