• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्युत तारेमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

editor desk by editor desk
April 30, 2025
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
विद्युत तारेमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील  बाभळे  येथील गट नंबर ५९ मधील शेतात दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी अंदाजे ९:३० वाजता आग लागली. या आगीत ईश्वर विठोबा महाजन आणि लक्ष्मण विठोबा माळी या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

विद्युत तारेमुळे ठिणगी पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत ईश्वर विठोबा महाजन यांच्या दोन हेक्टर क्षेत्रातील ठिबक सिंचनासह चारा आणि जमा करायचा बाकी असलेला मका कणीस जळून खाक झाला, ज्याची अंदाजित किंमत तीन लाख रुपये आहे. तर, लक्ष्मण विठोबा माळी यांच्या दोन हेक्टर बावीस आर क्षेत्रातील ठिबक सिंचनाची पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली. आगीमुळे सुमारे तीस क्विंटल मक्का आणि तीन लाख रुपये किंमतीचे ठिबक सिंचनाचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचानी आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नोंद घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले की, या आगीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडून योग्य भरपाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. तलाठी यांनी पाहणी अहवाल सादर करत योग्य कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

मध्यरात्री हॉटेलला लागली आग : १४ जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर !

Next Post

२१०० रुपयांचे आश्वासन दिल्याने लाडकी बहिण थेट पोलीसात !

Next Post
२१०० रुपयांचे आश्वासन दिल्याने लाडकी बहिण थेट पोलीसात !

२१०० रुपयांचे आश्वासन दिल्याने लाडकी बहिण थेट पोलीसात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group