• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान १०१  जणांवर पोलिसांनी कारवाई !

editor desk by editor desk
April 30, 2025
in क्राईम, जळगाव
0
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव : प्रतिनिधी

जिल्हाभरातील सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा पोलिस दलाकडून सोमवारी सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० वाजेदरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अनेक अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. दारूबंदी, जुगार, गांजा सेवन करणाऱ्या १०१ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी दारूबंदीच्या ५६ केसेस दाखल केल्या, तर सट्टा जुगाराच्या २९ प्रकरणांचा पर्दाफाश केला. यासोबतच, अंमली पदार्थ विरोधी कारवाईत (एनडीपीएस) १६ जणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट (एनबीडब्ल्यू) बजावणीत पोलिसांनी मोठी यश मिळवले असून ४१ वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांकडून जिल्हाभरात नाकाबंदी देखील लावली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी १ हजार ५१७ वाहनांची कसून तपासणी केली. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३०५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात यापुढेही अशा प्रकारची मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Previous Post

भावनिकतेमुळे एखाद्यावर विश्वासघात होऊ शकतो याची जाणीव ठेवा

Next Post

संन्यास घेण्यास विरोध केल्याने पत्नीला मारहाण

Next Post
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

संन्यास घेण्यास विरोध केल्याने पत्नीला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group