सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय रुग्णालयातील डॉ. वैशंपायन शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टराने हॉस्टेलच्या रूममध्ये जीवन संपवल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. आदित्य नामबियर असे जीवन संपवलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयातील हॉस्टेल परिसरात शहर पोलिसांनी धाव घेतली. सदर घटनास्थळावर रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठी गर्दी केली आहे. जीवन संपवल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी शिकाऊ डॉक्टराचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आला आहे. मृत आदित्य यांनी जीवन का संपवले याबाबत पोलीस तपास करीत आहेत.