जळगाव : प्रतिनिधी
निंभोराहून येथून जळगावकडे येणाऱ्या बसला महामार्गावरुन समोरुन येणाऱ्या ट्रकने कट मारला. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली. बसमध्ये साधारण ४० ते ५० प्रवासी होते, मात्र सुदैवाने बसमधील कोणाला काहीही दुखापत झाली नाही. ही घटना दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास आहुजा नगर ते द्वारकागनर स्टॉपदरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथून (एमएच २०, बीई २४२१) क्रमांकाची बस प्रवासी घेवून जळगावकडे येत होती. महामार्गावरुन येत असतांना आहुजा नगर ते द्वारकानगर स्टॉपच्या दरम्यान, समोरुन ओव्हरटेक ट्रक येत होता. त्या ट्रकने बसला कट मारल्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला उतरली. यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली होती. मात्र रस्त्याच्या कडेला असलेलया झाडाझुडपांमुळे बस जागीच थांबल्यामुळे पुढील घटना टळल्याचे प्रवाशांनी सांगितले. ट्रक चालकाने बसला कट मारल्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला उतरल्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, कट मारणारा ट्रक हा तेथून पसार झाला. बस पलटी होऊन खड्ड्यात पडली असती तर मात्र मोठी दुर्घटना झाली असती. बसमध्ये सुमारे चाळीस ते पन्नास प्रवासी होते, परंतू या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. याअपघातामुळे प्रवासी व चालक-वाहक घाबरले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. रस्त्याच्या कडेला उतरलेल्या बसला दोन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.