धरणगाव : प्रतिनिधी
ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र म्हणजे आपुलकी, माया, जिव्हाळा असलेली जागा आहे. जेष्ठाच संघर्षमय आणि प्रेममय आयुष्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या अनुभवाचं, आशीर्वादाचं मोल अनमोल आहे. तुमच्या प्रत्येक सुरकतीत संघर्षाची, जिद्दीची, प्रेमाची कथा दडलेली आहे. आज तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने फुलण्यासाठी एक सुंदर विरंगुळा मिळावा, यासाठी आम्ही हे विरंगुळा केंद्र उभारले आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बचत गटांची जिद्द, धरणगावच्या विकासाचा आधारस्तंभ असून महिलांच्या बचत गटांसाठी व्यापारी संकुल करीता 2 कोटींचा निधी मंजूर केला असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लखपती दीदी होण्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण करून विरंगुळा केंद्राची चाबी जेष्ठांना देवून करमुक्त बचत गट उपक्रमात सहभागी झालेल्या महिला बचत गटांचा सन्मान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाला.याप्रसंगी ते बोलत होते.
नगरविकास विभागामार्फत खास बाब म्हणून ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन, धरणगावच्या जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र , संरक्षक भिंत, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक व विविध सुविधे सह उभारण्यात आले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
महिला बचत गटांच्या कार्याचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक
करमुक्त बचत गट उपक्रमाचा उल्लेख करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव मधील २५० बचत गटांमधून अडीच हजार कुटुंबांना जगण्याचं बळ मिळालं आहे. यंदाच्या वर्षी ‘करमुक्त बचत गट’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात ११७ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवून ५० लाख रुपयांहून अधिक कर भरणा केला आहे. ही केवळ वसुली नाही, तर शहराच्या आर्थिक शिस्तीचा व सामाजिक बांधिलकीचा आदर्श आहे.” “महिला फक्त बचत गट चालवत नाहीत, त्या संपूर्ण कुटुंबाचा, समाजाचा, आणि शहराचा आर्थिक कणा मजबूत करत आहेत.जेष्ठ नागरिकांच्या विरुंगुळा केंद्रात नपा फंडातून AC व मोठा TV बसविनुचे निर्देश दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून वाचनासाठी वर्तमानपत्रे, विविध पुस्तके, खेळण्यासाठी कॅरम, चेस, चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम यांसह दररोज योगासने व व्यायामवर्गाची सोय येथे उपलब्ध असेल. आरोग्य शिबिरे, सरकारी योजनांची माहिती, तसेच मनोरंजनपर कार्यक्रमही आयोजित केले जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या केंद्राचे व्यवस्थापन खुद्द जेष्ठ नागरिकांकडे राहणार असल्याचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक किरण पाटील यांनी केले. तार आभार कार्यालयीन अधिक्षक भिकन पारधी यांनी मानले. कार्यक्रमाच्या अखेरीस बचत गटातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिलेला एक स्टील बाऊल व प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यासाठी झाडांचे रोपं भेट देण्यात आले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते डी.जी.पाटील, सुभाषअन्ना पाटील. रॉ.का.चे ज्ञानेश्वर महाजन, जि.प.चे उप मुख्य , कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे , मुख्याधिकारी रामनिवास झवर, महिला समुदाय संघटक पुष्पा सैंदाणे, सीमा माळी, दिपाली साळुंखे , नूतन सोनवणे, जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व जेष्ठ नागरिक, माजी गट नेते पप्पू भावे, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील , शहर प्रमुख विलास महाजन, धीरेंद्र पुर्भे, भाजपाचे, संजय महाजन , कैलास माळी सर, दिलीप महाजन, विजय महाजन, ललित नेवे चंदन पाटील, भालचंद्र जाधव , वाल्मिक पाटील, बाळू येवले, कन्हेया रायमुलकर, संतोष सोनवणे, यांच्यासह जेष्ठ नागरिक , पदाधिकारी, व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते