• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बोर घाटात दुचाकीचा भीषण अपघात : वडिलांसह मुलाचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
April 28, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
बोर घाटात दुचाकीचा भीषण अपघात : वडिलांसह मुलाचा दुर्देवी मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील बोर घाटात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार पिंटू बोडोले (वय 30) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ऋतिक बोडोले यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने संपूर्ण रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय 28) आणि दोन मुले -ऋतिक (वय३) व आठ महिन्यांचा टेंगुराम – यांच्यासह भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. रविवार (दि.27) रोजी रात्रीच्या सुमारास बोर घाटात, खेरगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या थार जीपने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पिंटू आणि त्यांच्या लहानग्या ऋतिकचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

बोडोले कुटुंब भुसावळ येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. गरीब आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर अचानक मोठे संकट कोसळले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच भाजप रावेर पूर्व तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील व बाळा आमोदकर यांनी तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी मालुबाई बोडोले आणि आठ महिन्यांचा टेंगुराम यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी फैजपूर येथे हलवले आहे. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, पोलिसांनी संबंधित थार जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Previous Post

बोलोरो आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जागीच ठार !

Next Post

भाविकांसाठी आनंदाची बातमी : बुधवारपासून सुरू होणार चार धाम यात्रा !

Next Post
भाविकांसाठी आनंदाची बातमी : बुधवारपासून सुरू होणार चार धाम यात्रा !

भाविकांसाठी आनंदाची बातमी : बुधवारपासून सुरू होणार चार धाम यात्रा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group