Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : गळ्याला चाकू लावून ट्रकचालकाला लुटले !
    अमळनेर

    खळबळजनक : गळ्याला चाकू लावून ट्रकचालकाला लुटले !

    editor deskBy editor deskApril 28, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील नरडाणा येथे अमळनेर मार्गे जातांना गलवाडे रस्त्यावर तीन जण मोटरसायकलवर येवून रस्त्यात ट्रक अडवून ट्रक ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याकडून १ हजार रुपये हिसकावले आणि मालकाकडून एक लाख रुपये मागितल्याची घटना दि.२७रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, अनिल अश्रूबा विलग रा. कोनोसी ता. शिवगाव जि. अहिल्यानगर हा अहिल्यानगर येथील स्वप्नील झिने यांचा हायवा ट्रक क्रमांक एम.एच. १६, सी.ई.४७९७ मध्ये भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे अमळनेर मार्गे जातांना गलवाडे रस्त्यावर तीन जण मोटरसायकलवर आले आणि त्यांनी मोटरसायकल पुढे लावून ट्रक अडवला. एक जण केबिनमध्ये चढून म्हणाला की, मी कैलास नवघरे आहे, अमळनेरचा डॉन आहे. ट्रक ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावून आताच्या आता एक लाख रुपये दे म्हणत खिश्यात हात घातला आणि एक हजार रुपये काढून घेतले. दुसऱ्यानेही त्याचे नाव मोझम शेख असे सांगितले. नंतर त्यांनी मालकाला फोन लावून एक लाख मागव नाहीतर तुझा खून करून टाकू, आम्ही पाच खून केले असल्याचे सांगितले. ड्रायव्हरने मालकाला फोन लावला व पैश्यांची मागणी करून खून करण्याची धमकी दिली. नंतर ट्रक एका बाजूला कॉलनीत नेला.

    परंतु मालकाने अमळनेर पोलिसांना फोन लावल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, राजेंद्र कोठवदे, संतोष पवार, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, सुनील पाटील, योगेश बागुल, संजय सोनवणे हे घटनास्थळी धाव घेवून कैलास नवघरे यास अटक केली. मात्र, याप्रसंगी मोझम शेख व तिसरा अनोळखी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. तिघाविरुद्ध रस्ता अडवून जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत. दरम्यान, कैलास नवघरे हा खून प्रकरणात सुरत येथे शिक्षा भोगत असून तो पॅरोलवर बाहेर आला होता. दि २७ रोजीच तो परत जाणार होता. तत्पूर्वी ट्रक चालकाला धमकवण्याच्या प्रकरणात तो पोलिसांच्या तावडीत अडकला.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    December 21, 2025

    भाजप उमेदवाराकडून ठाकरे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न !

    December 20, 2025

    मालवाहू वाहनाच्या धडकेत ट्रॅक्टरवरील मजुराचा बळी

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.