जळगाव प्रतिनिधी । बोरींगच्या वायरमुळे झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत संपुर्ण घर जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. अग्निशमन पथकाच्या दोन बंबामुळे ही आग आटोक्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, याबाबत माहिती अशी की, सिंधी कॉलनी कॉलनीतील सेवा मंडळच्या समोर दिलीप कन्हैयालाल पमनानी यांच्या मालकीचे घर आहे. त्यांनी हे एका महिलेला भाड्याने दिले आहे. ही महिला काही दिवसांपासून हरिव्दार येथे गेली आहे. त्यामुळे सदरचे घर बंद आहे. रविवारी पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रुप धारण केले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार काही वेळातच चालक विक्रांत घोडेस्वार, वसंत दांडेकर, नंदकिशोर खडके, फायरमॅन भरत बारी, सोपान कोल्हे, नीलेश सुर्वे, भगवान जाधव या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंब घेवून घटनास्थळ गाठले.दोन अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत संपूर्ण घर खाक झाले आहे. घरात बोरिंग मशिनचा स्विच सुरुच होता.