Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ म्हटलेचा नाही ; महायुतीच्या मंत्र्यांचे मोठे विधान !
    राजकारण

    लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ म्हटलेचा नाही ; महायुतीच्या मंत्र्यांचे मोठे विधान !

    editor deskBy editor deskApril 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज मोठे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? याकडे लक्ष लागले असताना आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी 2100 रुपये देण्याबाबत मोठे विधान केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांत खुश असल्याचेही ते म्हणालेत.

    राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. महायुती सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. तेव्हा अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतात, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. 10 मार्च रोजी अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र या योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यानंतर आता नरहरी झिरवाळ 2100 रुपयांबाबत स्पष्ट बोलले आहेत.

    लाडक्या बहिणींना 2100 ऐवजी 1500 रुपयेच मिळत आहेत. तेही नियमित मिळत नसल्याने लाडक्या बहिणी नाराज आहेत. असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत मंत्री नरहरी झिरवाळ यांना विचारला. यावर बोलताना लाडक्या बहिणी नाराज आहेत, हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे कोणीही जाहीर केलेले नाही, असे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेत.

    विरोधकांनी आधी म्हटले की महायुती लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे 1500 रुपये देण्याची ऐपत नाही अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी म्हटले की 2100 रुपये देणार आणि मग 1500 रुपये दिले नाहीत तर 2100 कसे देणार? अशी टीका केली. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले तर आता 2100 रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खूश आहेत, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.