जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील बसस्थानकाजवळील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील बसस्थानकाजवळ स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम आहे. रविवारी ३ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने विटनेर रस्त्यावर पुलाच्या पुढे पंचर दुकानाजवळ दुचाकी पार्क करू लावली. त्यानंतर त्याने स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू गावातील नागरीकांना चोरीची चाहूल लागल्याने अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. याबाबत जळके येथील पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
दरम्यान काही दिवसांपूवी वसंतवाडी गावातून विद्यूत उपकेंद्राजवळ गुरे चोरून नेणारे चाकी वाहन गावकऱ्यांच्या सतर्कतेने पकडले होते. त्यानंतर विटनेर रस्त्यावर अज्ञात तीन जणांनी दुचाकीस्वाराला पिस्तूलाचा धाक दाखवून रोकडसह मोबाईल लांबविले होते. या घटना ताजी असतांनाच रविवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारा अज्ञात चोरट्यांनी जळके गावातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.