मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरातील बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याचा उद्धवसेनेच्या वतीने आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करीत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आले.
या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासह हा हल्ला रोखण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलक उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. पाकिस्तानी ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित दहशतवादी संघटना ‘टीआरएफ’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा निषेध केला जात आहे.
शालिमार चौकात झालेल्या आंदोलनात पाकच्या ध्वजाची होळी करीत ‘देश के इन गद्दारोंको गोली मारो सालों को’, ‘राजीनामा द्या आमित शहा राजीनामा द्या’ यासह पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
उपनेते सुनील बागूल, सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, योगेश गाडेकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.