चाळीसगाव : प्रतिनिधी
चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेला इसम जखमी झाल्याची घटना धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवद फाट्याजवळील वळणावर घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, संभाजी शिवाजी पाटील (४७, सोयगाव, मालेगाव) व राजेंद्र शालीदर जाधव (३९, राममंदिर, ग्रा. पं. मालेगाव) हे शनिवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच ४१/बीक्यू २८१७) वरून जात असताना धुळेकडून चाळीसगावकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात राजेंद्र शालिंदर जाधव यांचा मृत्यू झाला तर संभाजी शिवाजी पाटील हे जखमी झाले. हा अपघात धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवद फाट्याजवळ वळणावर झाला. अपघात होताच चारचाकी वाहनावरील (एमएच १९/डीव्ही ०५०५) चालक जागेवर न थांबता पळून गेला. याप्रकरणी या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे