जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घरात घुसून पतीने त्यांची पत्नी रुपाली नरेंद्र काकडे (३४) यांच्यावर धारदार सुरीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना २१ एप्रिल रोजी रामेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र काकडे याने दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने पत्नी रुपाली यांच्यावर गळ्यावर आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रुपाली काकडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नरेंद्र काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.