Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अर्धनग्न तरुणांनी महामार्गावरील वाहनांवर केला हल्ला
    क्राईम

    अर्धनग्न तरुणांनी महामार्गावरील वाहनांवर केला हल्ला

    editor deskBy editor deskApril 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर १५ ते २० अर्धनग्न तरुणांनी हातात तलवारी, अंडी व मोठमोठे दगड घेऊन महामार्ग अडविला. तसेच अनेक वाहनांवर हल्ला केला. दगडफेक केल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना २१ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, तांबापुरा परिसरातील मतीन पटेल व त्यांचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथून जळगावकडे येत असताना गाडेगावनजीक एका पाईप कंपनीजवळ १५ ते २० अर्धनग्न तरुणांनी हातात तलवारी, अंडी व मोठमोठे दगड घेऊन महामार्ग अडविला. तसेच अनेक वाहनांवर दगडफेक केल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहनांमध्ये महिला व लहान मुलेदेखील होतेमतीन पटेल व इतरांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन पोलिस कर्मचारी प्रदीप पाटील, रवींद्र पाटील, कैलास पाटील यांना माहिती दिली. त्यांनी ही घटना वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनेविषयी तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्या संशयितांचा शोध घेतला जात आहे. महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या घटनेची सखोल चौकशी करावी, महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, रात्रीच्या सुमारास महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवावी, तर महामार्गावरील सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी स्वतंत्र विशेष पथकाची नियुक्ती करण्याची मागणी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.