धरणगाव तालुक्यातील विहीरफाटा येथे घडली घटना
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विहीरफाटा येथे गोळीबार करीत एकाचा खून झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. घटनास्थळी पाळधी पोलीस स्थानकाचे पोलीस पोहचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील विहीरफाटा येथे आज दि.२२ एप्रिल रोजी सायकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान विहीरफाटा चौफुलीवर काही अनोळखी इसमांनी गोळीबार एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी गोळीबार झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.