• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संजय राऊतांची घणाघाती टीका : शिंदे गटाचे लोक महाराष्ट्राचे शत्रू !

editor desk by editor desk
April 21, 2025
in राजकारण, राज्य
0
संजय राऊतांची घणाघाती टीका : शिंदे गटाचे लोक महाराष्ट्राचे शत्रू !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदे गटाचे नेते हे चु.. आहेत, त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते महाराष्ट्राच शत्रू आहेत. दोन्ही भाऊ एकत्र आले की त्यांच्या शुन्य नशीबी येणार आहे, त्यांना हे नको आहे. त्यांच्या मनात द्वेष भरलेला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  शरद पवार आणि अजित पवार अनेकदा सोबत आलेले आहेत. आम्ही तसे एकनाथ शिंदे सोबत तुम्हाला कधी दिसलो का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. आम्ही शिंदे गटाला भेटणार नाही. आमच्याकडे संस्था नाहीत, जेथे एकत्र आलो आणि बंद दाराआड बसलो, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले की, दैनिक सामनामध्ये जे लिहले आहे, त्याच भावना आतापर्यंत महाराष्ट्राच्या होत्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत महाराष्ट्राची सूत्र हाती घ्यावी ही जनभावना आहे. हीच भावना ठाकरे बंधूंनी व्यक्त केली आहे. दोन प्रमुख नेते अशी भूमिका मांडतात तेव्हा आपण ती गांभीर्याने घेत पुढे जायला हवे.

संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अनेकांना वेदना होणार. यांनी दोघांनी एकत्र राजकारण केले तर आम्हाला कायमचे शेतावर जावे लागेल किंवा संघ शाखेत जात संघ दक्ष हेच करावे लागेल. महाराष्ट्र हा ठाकरेंवर प्रेम करणारा आहे. महाराष्ट्राने सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रेम केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंबियांवर राज्यातील जनतेचे असलेले प्रेम यामुळे अनेकांना भीती वाटत असेल त्यातून काहीच्या पोटातून मळमळ बाहेर पडत असेल, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. महाराष्ट्रात चांगले काही घडावे आणि राज्याने हुकुमशाहीविरोधात एकत्र लढत दिली आहे, हे विसरू नये.

संजय राऊत म्हणाले की, कुणी काही बोलू द्या कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही. जेव्हा उद्धवसाहेबांनी ठरवले आहे की एक पाऊल पुढे टाकायचे मागे काय झाले या कडे दुर्लक्ष करत पुढे जाणार आहोत. यापूर्वी काँग्रेससोबत नव्हतो तेव्हा त्यांच्यावर आम्ही अनेक टीका केल्या पण जेव्हा एकत्र यायचे ठरले तेव्हा आम्ही भविष्याचा विचार केला, मागे वळून पाहिले नाही. भूतकाळात न डोकावणे हे उत्तम राजकारण असते.

संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केजली नसती, हे जर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कळत नसेल तर मी काय बोलणार. जेव्हा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली तेव्हा आमच्या शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिला आहे.

 

Previous Post

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : राज्यात कुठेही हिंदी लादली जाणार नाही !

Next Post

युतीबाबत कोणीही बोलू नये ; राज ठाकरेंनी दिले कार्यकर्त्यांना आदेश ! 

Next Post
युतीबाबत कोणीही बोलू नये ; राज ठाकरेंनी दिले कार्यकर्त्यांना आदेश ! 

युतीबाबत कोणीही बोलू नये ; राज ठाकरेंनी दिले कार्यकर्त्यांना आदेश ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

तुमची काही प्रभावशाली लोकांशी भेट होणार जे तुम्हाला फायदेशीर ठरणार !

July 3, 2025
‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group