जळगाव : प्रतिनिधी
मॉर्निंग वॉकहून परतत असताना महावितरणच्या सहाय्यक अभियंता रत्ना किरण पाटील (४३, रा. शिवाजीनगर) यांच्या गळ्यातील एक लाख ९० हजार रुपये किंमतीची सोनपोत दुचाकीस्वाराने ओढून नेली. ही घटना २० एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास खडके चाळ जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरातील रहिवासी रत्ना पाटील (४३) या महावितरण कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता आहे. त्या मॉर्निंग वॉकसाठी रेल्वे गेट जवळील साईबाबा मंदिरापर्यंत गेल्या. तेथून घराकडे परतत असताना खडकेचाळजवळ पाठीमागून एक दुचाकीस्वार आला व त्याने सदर महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओढून पसार झाला. महिलेने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटा शिवाजीनगर उड्डाणुलाच्या दिशेने पळून गेला. या प्रकरणी रत्ना पाटील यांनी शहर पोलिसात फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.