जळगाव : प्रतिनिधी
पती कामावर, पत्नी आणि मुलगी लग्नाला गेलेले असताना चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरातून एक लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना १९ एप्रिल रोजी अयोध्यानगरात घडली. भरदिवसा झालेल्या घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्यानगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये राहणारे अभियंता विलास तुकाराम चौधरी हे शनिवारी सकाळी कामावर गेले. तसेच त्यांच्या पत्नी व मुलगी इंदूर येथे लग्नाला गेले. त्यानंतर दुपारी १२:३० ते १:३० या वेळेत चोरट्यांनी – चौधरी यांच्या घराच्या दरवाजाची कडी व – कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात एका कपाटामध्ये असलेल्या प्रत्येकी ३२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन – चेन, १२ व १६ हजार रुपये किमतीच्या – सोन्याच्या दोन अंगठ्या, ६० हजार रुपये 7 किमतीची चांदी असे एकूण एक लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार दुपारी दीड वाजेच्या सुमारास वॉचमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने चौधरी यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर ते घरी आले असता घरामध्ये कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.
अपार्टमेंटच्च्या पहिल्या मजल्यावर तीन फ्लॅट असून या तीनही फ्लॅटला कुलूप होते. घरफोडी झालेल्या घराच्या शेजारील एका घराच्या दरवाजाचेही चोरट्यांनी कुलूप तोडल्याचे आढळून आले. तेथेही चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. ज्या अपार्टमेंटमध्ये ही घरफोडी झाली तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र त्यापासून काही अंतरावर असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून व डमडाटाची माहिती घेऊन चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी चौधरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राहुल तायडे करीत आहेत. चौधरी यांचे घर अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर आहे. भरदिवसा पहिल्या मजल्यावर चोरटे पोहोचले व त्यांनी घरफोडी केली. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे