यावल प्रतिनिधी । इंधन दरवाढच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीने यावल पोलीस ठाण्याच्या समोर महागाईमुक्त भारत आंदोलन व मोदी सारकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने पाच राज्यात निवडणूक सुरू असतांना पेट्रोल- डिझेल व गॅस यांची दरवाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसाधारण व्यक्तींचे कंबरडे मोडले आहे. बेजबाबदार व अर्थहीन शासन कारभाराने संपूर्ण देशाला वेठीस धरले असून जिवनावश्यक वस्तूंपासून ते पेट्रोल-डीझेल, गृहणीचे स्वंयपाक गॅस या प्रत्येक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. या महागाईच्या विरोधात यावल पोलीस ठाण्याच्या आवारात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, माजी नगरसेवक अस्लम शेख नबी, माजी नगरसेवक समीर शेख मोमीन, माजी नगरसेवक गुलाम रसुल, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, राहुल तायडे, विलास अडकमोल, अजय अडकमोल, संदीप सोनवणे, काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, पंचायत समितीचे मावळते सदस्य सरफराज तडवी, पुंडलीक बारी, संगोयोचे माजी अध्यक्ष खलील शाह यांच्यासह आदी पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.