Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात बंद घर फोडून रोकडसह सोन्याचांदीचे दागिन्यांची चोरी
    क्राईम

    जळगावात बंद घर फोडून रोकडसह सोन्याचांदीचे दागिन्यांची चोरी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील नूतन वर्षा कॉलनीतील बंद घर फोडून रोकडसह सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याबाबत गुरूवार ३१ मार्च रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती श्रीकृष्ण मुजुमदार (वय-६०, रा. नूतन वर्षा कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १२ मार्च रोजी त्या घर बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घर बंद पाहून संधी साधत घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीच्या मुर्त्या व शिक्के आणि १६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घरी आल्यावर उघडकिला आला. यासंदर्भात गुरुवार ३१ मार्च रोजी रात्री त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक शिरसाठ करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.