अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सात्री येथे एकाला मारहाण करून गाडीत डांबत पैसे लंपास केल्याची घटना १६ रोजी सायंकाळी घडली आहे. याबाबत चौघांविरुद्ध मारवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी संदीप सुरेश बोरसे (वय ३५) याने दिलेल्या तक्रारीनुसार, १६ रोजी सायंकाळी ७वाजता गावातील मराठी शाळेसमोर फिर्यादी त्याच्या वाहनात लग्नाचे वऱ्हाड बसविण्यासाठी जात असता तेथे महेंद्र शालीग्राम बोरसे, विनोद शालीग्राम बोरसे, मनोहर पुंडलिक बोरसे, शालिग्राम संतोष बोरसे (सर्व रा. सात्री ता. अमळनेर) असे उभे होते व त्यांनी जुन्या वादाचा मनात राग ठेवून फिर्यादीला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर चौघांनी फिर्यादीला पकडून पिकअप गाडी मध्ये कोंडून ठेवले व गाडीचे दोन्ही दरवाजे बाहेरून चाबीने लॉक करून डांबले. खूप मारहाण झाल्याने फिर्यादी गाडीत बेशुद्ध झाला होता. त्याला रात्री दहा वाजता अमळनेर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे फिर्यादीची पत्नी भाग्यश्री संदीप पाटील व चुलत भाऊ योगेश प्रल्हाद पाटील हजर होते. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ. संजय पाटील हे करीत आहेत.