भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका भागातल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील एका भागात सहा वर्षाची बालिका खेळत असताना नूर मोहंमद (४०) याने सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
या बालिकेने तेथून कसा तरी पळ काढून आपल्या आईला याबाबत माहिती दिली. या महिलेने बाजारपेठ पोलिस स्थानकात फिर्याद दिली. यावरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अमळनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे