बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीने चर्चेत येत असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड मधील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकील करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असल्याने या विरोधात तक्रार केली होती. याचा राग मनात धरूनच ही मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात बीड जिल्हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला वकिलाला जबर मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत सापडली आहे.
अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणार्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पपईने जबर मारहाण. महिलेने गावातील ध्वनि प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाउडस्पीकर लाऊ नयेत घरा पुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातून ही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे?