चाळीसगाव : प्रतिनिधी
शिवीगाळ करण्याच्या कारणातून कोयत्याने तरुणाच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी करत धमकी दिली. हा प्रकार चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे १५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनला पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश दत्तात्रय शिंदे, योगेश एरंडे, दीपक एरंडे, महेश छोटू एरंडे, छोटू राजाराम एरंडे (सर्व रा. खरजई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजय उत्तम काळे (रा. खरजई) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या पाहुण्यास शिवीगाळ केल्याबाबत विचारणा केली असता संशयित जयेश शिंदे याने हातातील लोखंडी कोयत्याने ठार मारण्याच्या उद्देशाने अजय याच्या डोक्यावर मारून दुखापत केली. तर इतरांनी अजय याचे पाहुणे दीपक जावरे यांना काठीने मारहाण केली