जळगाव : प्रतिनिधी
बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून गोविंद वामन आंबेकर (वय ३१, रा. सीताराम माळी चाळ, मिल परिसर धुळे) याला तीन ते चार जणांनी लोखंडी पाइपने मारहाण केली. यात त्याचे दोन्ही पाय फ्रैक्चर झाले. ही घटना शहरातील रामेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धुळे येथील गोविंद आंबेकर हा तरुण मिस्तरी काम करतो. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याला चार जणांनी अडविले. त्यातील एका जणाच्या बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून या सर्वांनी त्याला शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात दोन्ही पाय फ्रैक्चर केले. तरुणीचा भाऊ, मामा अशांसह चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.