जळगाव : प्रतिनिधी
दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलिस हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार (वय ४६) व पोलिस नाईक धनराज नारायण निकुंभ या दोघांना पोलीस ठाण्यातच वीस हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. या दोघांना निलंबीत करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी रवींद्र सोनार व धनराज निकुंभ या दोघांनी तक्रारदारकडे ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोड होऊन लाचेची रक्कम ही २० हजार रुपयांवर आली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. यावेळी ड्युटीवर असलेल्या रविंद्र सोनार यांना वीस हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होवून ते सद्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, या दोघांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहे.