Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री महाजनांनी दिली खडसे व पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रुनुकसानीची नोटीस !
    क्राईम

    मंत्री महाजनांनी दिली खडसे व पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रुनुकसानीची नोटीस !

    editor deskBy editor deskApril 15, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई  : वृत्तसंस्था

    राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप झाल्याच्या घटना नेहमीच चर्चेत असतांना आता मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप करणारे पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. या नोटिसीमुळे पुन्हा एकदा महाजन-खडसे संघर्ष पेटणार आहे.

    मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या एका कार्यक्रमात केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनीही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करताना आपणास त्या महिला अधिकाऱ्याचे नाव माहीत असून, आपण ते उघड करणार नाही, असा दावा केला होता. अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांच्या दाव्यानंतर गिरीश महाजन यांची राजकीय कोंडी सुरू झाली होती. तब्बल दोन आठवड्यांनंतर गिरीश महाजन यांनी अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांना आपण अब्रुनुकसानीची नोटीस बजावली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर टीका केली. जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाली आहे. आपण न्यायालयात या दोघांविरोधात लढणार असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आपल्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस दिली असल्याचा दावा केला असला तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

    एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला होता. एकनाथ खडसे यांनी म्हटले होते की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली. गिरीश महाजन यांच्या रंगला रात्री या नावाने असलेल्या क्लिपमध्ये थत्ते यांनी खळबळजनक माहिती उघड केलेली आहे. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव आपणास माहीत आहे. पण ते सांगणं उचित होणार नाही, असे क्लिपमध्ये नमूद करण्यात आल्याचे खडसे यांनी म्हटले होते. अमित शहा यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली, त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते. त्यांनी महिला आयएएस अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांबाबत थेट विचारणा केली होती. यावेळी महाजनांनी आपले अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो, असे उत्तर दिले. परंतु अमित शहा यांनी त्यांना तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि रात्री एकनंतर दिवसभरात शंभर-शंभर कॉल तुझे झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांग. पण, तुझं सीडीआर खरं बोलतो. रोज बोलण्याचं काय कारण आहे? असे प्रश्न केल्याचा दावा अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन क्लिपमध्ये केला आहे, याकडे खडसे यांनी लक्ष वेधले होते. याच आरोपावरून महाजन यांनी खडसे आणि थत्ते यांना नोटीस पाठविली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026

    वडिलांच्या निधनानंतरही चाळीसगावातील नेहाचा धैर्याचा पेपर; डोळ्यांत अश्रू, हातात पेन !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.