Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३३ वर्षीय महिलेला भागीदारांनी केली जबर मारहाण !
    क्राईम

    ३३ वर्षीय महिलेला भागीदारांनी केली जबर मारहाण !

    editor deskBy editor deskApril 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भागीदारीमध्ये घेतलेल्या कार्यालयाचे कागदपत्र हवे असल्यास स्टॅम्पवर लिहून द्या, असे सांगितल्याने दीपाली बाळू सुरवाडे (३३, रा. मन्यारखेडा शिवार) यांना तीन महिलांसह एकूण सहा जणांनी मारहाण केली. तर एका महिलेने बोटाला चावा घेत दुखापत केली. ही घटना १३ एप्रिल रोजी दीपाली यांच्या घरी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगावात भागीदारीत घेतलेल्या कार्यालयावरून वाद आहे. त्यात पांडुरंग ठाकरे, दगड्डू गवळे, रवींद्र दगडू गवळे, मनीषा दिनेश गवळे, शांताबाई दगडू गवळे, पूजा रवींद्र गवळे हे (सर्व रा. मेहरुण) १३ एप्रिल रोजी दीपाली सुरवाडे यांच्या घरी गेले. तेथे त्यांना कार्यालयाची कागदपत्रे मागितली. सुरवाडे यांनी स्टॅम्प आणून त्यावर लिहून द्या, असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यात मनीषा गवळे यांनी महिलेच्या बोटाला चावा घेतला. मारून टाकण्याचीही धमकी देण्यात आली. याप्रकरणी दीपाली सुरवाडे यांनी नशिराबाद पोलिसात फिर्याद दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026

    वडिलांच्या निधनानंतरही चाळीसगावातील नेहाचा धैर्याचा पेपर; डोळ्यांत अश्रू, हातात पेन !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.