Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरीचा जेसीबी विकत घेणाऱ्याला संशयिताला अटक
    क्राईम

    चोरीचा जेसीबी विकत घेणाऱ्याला संशयिताला अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 31, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथून चोरी करण्यात आलेले जेसीबी मशीन विकत घेणा-यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्याला पुढील तपासकामी जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    नंदलाल उर्फ करण राजेंद्र मोर्या रा. ऑटो नगर अशोक नगर, जळगाव असे जेसीबी विकत घेणाऱ्या संशयिताचे नाव आहे.
    एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी देवराज गजेबा सोनसाळे यांच्या मालकीची ७ लाख रुपये किंमतीची जेसीबी चोरी झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी उघडकीला आली होती. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान चोरीस गेलेले जेसीबी हे जळगावात विक्री झाल्याची माहिती मिळाली. जळगाव शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन गुन्ह्याची माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सय्यद, योगेश भारी पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी संशयित आरोपी नंदलाल उर्फ करण राजेंद्र मोरया रा. ऑटो नगर, अशोक नगर जळगाव याला शहरातील दूरदर्शन टॉवर येथून गुरुवार ३१ मार्च रोजी अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्या वाहनातून जेसीबी चोरून आणले ते वाहन (एमएच १८ एए ५०१) मिनी ट्रक देखील जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.