जळगाव : प्रतिनिधी
सुप्रीम कॉलनी येथील सपना विजय तायडे (वय १६) या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सपनाने महिनाभरापूर्वीच दहावीची परीक्षा दिली होती. ती सुप्रीम कॉलनीत आई, वडील, लहान भाऊ यांच्यासोबत राहत होती. सपनाचे वडील विजय हे एका कंपनीत कामगार आहेत. शुक्रवारी दुपारच्या वेळेस घरात कोणीही नसताना तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब दुपारी १ वाजता कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले.