मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य होत असतांना आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या हिंदी सिनेमााचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, या सिनेमातील काही सीन्सवर सेन्सॅार बोर्डाने कात्री लावली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन करत फुले सिनेमा जसा आहे तसा दाखवला नाही, तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले सिनेमाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाली आहे.
महात्मा फुले यांच्या कार्याच्या बाबत असलेले फुले सिनेमातील काही सीन काढण्याचे आदेश दिले आहेत. शासनाला आम्ही सांगतो की महात्मा फुले यांचे वांगमय प्रकाशित करण्यात आले आहेत. शासनाशी आम्ही सहमत नसल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सेन्सॅार बोर्डाचा निषेध नोंदविला. ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे ते म्हणाले. पुण्यातील फुले वाड्याच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निषेध नोंदविला.
मुख्यमंत्री यांना आवाहन आहे की एका बाजूला अभिवादन करताय आणि दुसऱ्या बाजूला सिनेमाला विरोध करत असाल, तर विरोधाभास नको, असे आंबेडकर म्हणाले. सिनेमा आहे तसा दाखवला पाहिजे, नाहीतर सेन्सॅार बोर्डाच्या कार्यालयावर धाव घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत. यावेळी महाराष्ट्र सरकारने फुले सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी करण्यात आली.