मुंबई : वृत्तसंस्था
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे. जो या कार्यक्रमाला येतो त्यांचा प्रमोशन होतो असे आयोजकांनी सांगितले. पण माझे प्रमोशन होण्यासाठी माझे सरकार राहिले पहिजे, असे ते म्हणाले आहे.
सुधीर मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की, पहिल्यांदा आमदार झाल्यावर टॅक्सीमधून विधानभवनात जात होतो. त्यावेळी ड्रायवर म्हणाला की विधानभवनाला बॉम्बने उडवले तर राज्यातील सगळे आनंदी होतील. त्या ड्रायव्हरला माहिती नव्हते की मी आमदार आहे. ज्या लोकशाही भवनात मी पहिल्यांदा निवडून गेलो त्या भवनावर लोकांचे किती राग आहे हे मला कळले. नाशिकमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्याच्या निमित्ताने विचारवंतांचे जाहीर व्याख्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी कधी तरी कॉलेजमध्ये असताना म्हणायचो कोशिश करणे वालो की कभी हार नही होती. मी चंद्रपूरवरून या व्याख्यान मालेसाठी नाशिकला इतक्या दूर आलो आहे. जे दडपन होतं ते कमी झालं आहे. आयोजक म्हणाले जो इथे येतो त्यांचं प्रमोशन होतं, फडणवीस मुख्यमंत्री झाले. 1995 मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो, निवडणूक झाल्यावर मी एम फील पास झालो. सुराणा जी असे म्हणाले की जो ह्या व्याख्यान मालेला येतो त्याचे प्रमोशन होते. दडपण तर निघाले पण शंका राहिली कारण प्रमोशन व्हायचे असेल तर सरकार कायम राहिले पाहिजे आणि माझे सरकार कायम राहिले पाहिजे, हे जेवढं खरं आहे तेवढंच उद्याच्या व्यक्त्याचे आणि परवाच्या व्यक्त्याचे नाव बघितल्यावर भीती निर्माण झाली. माझं प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम ठेवावे लागेल, आणि जो जो येतो त्यांचे प्रमोशन करायचे म्हटले तर दोन्ही खासदार(अरविंद सावंत, प्रणिती शिंदे) आहेत त्यांना पक्षात घ्यावे लागेल.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लोकसभेत मी पहिल्यांदा लढलो तेव्हादेखील हरलो होतो आणि आता देखील हरलो. त्यामुळे बहुतेक माझ्या नशिबात लोकसभा नसेल. महात्मा गांधी जयंती निमित्त दारूबंदी सप्ताह पाळला पाहिजे, असे आमचे ठरले. तेव्हा एक सदस्य म्हणाला कशाला करता, करायचाच असेल तर महात्मा गांधी यांच्या जयंती ऐवजी मोरारजी देसाई यांच्या जन्म दिवसाला करा, कारण त्यांचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला आहे, त्यामुळे चार वर्षांमधून एकदाच दारू बंदी सप्ताह येईल.