जळगाव : प्रतिनिधी
दारुच्या नशेत काहीही एक कारण नसतांना संशयित मुजाहिद शेख उर्फ गण्या रा. मोहाडी रोड याने वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. ही घटना दि. ९ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बळीराम पेठेतील दुर्गा देवी मंदिराच्या गल्लीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बळीराम पेठेतील दुर्गा देवी मंदिराच्या गल्लीत गणेश वसंतराव कुलकर्णी (वय ५१) हे वास्तव्यास आहेत. दि. ९ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते घरी झोपलेले असतांना संशयित मुजाहीद शेख उर्फ गण्या हा त्याठिकाणी आला. त्याने गणेश कुलकर्णी यांना शिवीगाळ करीत त्यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या (एमएच १९, ईजी ९१२०) क्रमांकाच्या कारच्या मागील व पुढील दोन्ही काचा फोडून नुकसान केले. दरम्यान, कुलकर्णी यांनी शहर पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित मुजाहीद शेख उर्फ गण्या रा. मोहाडी, ता. जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.