• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार !

editor desk by editor desk
April 11, 2025
in क्राईम, जळगाव
0
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार !

जळगाव : प्रतिनिधी

पाथरी गावातून जळगावकडे निघालेल्या दुचाकीला जळगावकडून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने उडविल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजता वावडदा गावाजवळ घडली. या अपघातात दुचाकीवरील पाथरी गावातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शासकीय महाविद्यालय वैद्यकीय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावेश गोरख पाटील (वय ३५) व योगेश ऊर्फ महेंद्र वसंत जाधव (वय ३८) अशी मृतांची नाव आहेत. तर संदीप शांताराम भिल (वय ३५) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील पाथरी येथून भावेश गोरख पाटील, योगेश ऊर्फ महेंद्र वसंत जाधव व संदीप शांताराम भिल हे तिघे जण जळगावशहराकडे दुचाकीने येत होते. वावडदा गावाजवळ आले असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, सीझेड ४२४६) या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघे जण दूर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने पाथरी गावात शोककळा पसरली आहे.

दोन्ही युवकांच्या अपघाती मृत्यूमुळे पाथरी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांसह पाथरी ग्रामस्थांनी घटनास्थळी व रुग्णालयात गर्दी केली होती. या अपघातातील मयत भावेश गोरख पाटील हा जळगाव शहरातील एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये चालक म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे. तर योगेश वसंत जाधव हे टेलरिंगचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चारचाकी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात भावेश गोरख पाटील व योगेश वसंत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप शांताराम भिल याला पाथरी येथील रहिवासी राहुल पाटील, पंडित महाजन, पोलिस पाटील संजीव लंगरे व योगेश सोनवणे यांनी रुग्णवाहिका बोलावून घेत, तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

Previous Post

सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य !

Next Post

तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी : दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Next Post
विना परवानगी बॅनर लावले : सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी : दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
एरंडोल

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group