Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आक्षेपार्ह पोस्टवरून दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा
    क्राईम

    आक्षेपार्ह पोस्टवरून दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या संशयावरून खान्देश मॉल मधील आयनॉक्स थिएटर येथे दाम्पत्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    धरणगाव येथील हेमंत नवनीतलाल दुतिया (वय-४८, रा. भाटीया गल्ली) हे कॉटन जिनिंग मिलमध्ये नोकरीस आहे. हे रविवार २७ रोजी पत्नी, लहान मुलगी व सासरे हारेश प्रेमजी भाटे यांच्यासोबत दुपारी ३ वाजता खान्देश सेंट्रल मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी आले होते. चित्रपट सुटल्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास ते चित्रपटगृहाच्या बाहेर आले असता. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राजेंद्र किसन महाजन रा. लहान माळीवाडा धरणगाव, धिरेंद्र पुरभे, गजानन मालपुरे, महानगरप्रमुख शरद तायडे, शोभा चौधरी, सरीता माळी, भिमा धनगर रा. नेहरुनगर धरणगाव यांच्यासह चार ते पाच जणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट का टाकली? असे म्हणत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, दुतिया यांनी मी अशी कोणतीही पोस्ट टाकलेली नाही असे सांगत असतांना शिवसैनिकांनी चापटांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.

    हेमंत दुतिया यांना शिवसैनिक मारहाण करीत असतांना त्यांची पत्नी गौरी यांनी पतीला सोडविण्यासाठी गेल्या. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या झटापटीत गौरी दुतिया यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले असून त्यांच्या हाताला मार लागला आहे. याप्रकरणी हेमंत दुतिया यांच्या फिर्यादीवरून सोमवारी २८ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.