Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा जळगावात घरफोडी : चोरट्यांनी रोकडसह दागिने लांबविले !
    क्राईम

    भरदिवसा जळगावात घरफोडी : चोरट्यांनी रोकडसह दागिने लांबविले !

    editor deskBy editor deskApril 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील एका पत्रकाराच्या घरात भर दिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्यासह चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना आज दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावर असलेल्या मायादेवी मंदिराच्या मागील बाजूला अरुंधती अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर पब्लिक लाईव्ह पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची चव्हाण यांच्या पत्नी दोन्ही मुलांना घेऊन अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये गेले असता. अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७ ग्राम वजनाची सोन्याची चैन तर ५ भारचे चांदीचे ब्रासलेट व ८५ हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. यानंतर चव्हाण यांच्या पत्नी घरी पोहोचल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसताच. त्यांना चोरी झाल्याचे समजले त्यांनी लागलीच. रामानंद पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्यासह पोलीस पथक घटना घटनास्थळी दाखल झाले होते. शेवटचे वृत्त आती आले तेव्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.