एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळकोठा बु, येथे एका महिलेने राहत्या घरातील स्वयंपाकाच्या खोलीच्या छताच्या अँगलला अडकविलेल्या दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहनी संदीप पारखे (२६, पिंपळकोठा ब.) या महिलेने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात स्वयंपाकाच्या खोलीच्या छताच्या अँगलला अडकविलेल्या दोरीने गळफास लावून घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एरंडोल पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोनि नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शंकर पवार करीत आहेत.